Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

 

तंत्रज्ञाचा विकास होण्यापूर्वी गावखेडी संस्कृती व परंपरा यांनी समृद्ध होती.  उन्हाळ्यात खळेदळे झाले की ग्रामदैवतांची यात्रा साजऱ्या केल्या जायच्या . यात्रा साजऱ्या होण्यामागचा उद्देश हाच होता की माणसं एकत्र यायची , कामामधून वेळ भेटायचा , यात्रेनिमित्त सासुरवाशीण असणाऱ्या लेकीबाळी आपापल्या माहेरी यायच्या , माणस आपली सुख-दुख एकमेकांसोबत वाटायची . यात्रेनिमित्त गावामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजनदेखील केल जायच. 


गाव म्हटलं की ग्रामदैवत आलंच, असंच आहे आरळी बु च्या ख्वाजा बंदेनवाज ची यात्रा जवळपास १०० वर्षापेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. मुळात हिंदू बहुसंख्य असलेल्या आरळी गावात मुस्लिम ग्रामदैवताची यात्रा सर्व धर्मातील लोक  उत्साहाने साजरे करतात याबद्दल नवल वाटायला नको. बंदेनवाज देवतेबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. आरळी बु गावाला फकीर नसल्यामुळे त्या काळात बंदेनवाजाच्या फकिरीचा मान चिंचोली गावातील फकीर यांना मिळाला. 

            गावातील जुन्या जाणकरांच्या चर्चेतून यात्रेबद्दल अनेक गोष्टी समजल्या पूर्वी गावामध्ये यात्रा असली की , कुस्त्या , भाकरीवरील तमाशा इत्यादी असायचे पुढे तंत्रज्ञान विकसित झाल त्याप्रमाणे गावात पडद्यावरील चित्रपट दाखवल जायच. गावची सध्याची ग्रामपंचायत जिथे आहे तिच्या पाठीमागील मोकळ्या शेतात शोभेचे दारुकाम केल जायच फटाक्यांची आतषबाजी केली जायची. 

आरळी बु गावाला सांस्कृतिक वारसा लाभलेला , अनेक दिग्गज कलाकार जसे की निळू भाऊ फुले , ज्योती चांदेकर यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावलेली  होती. गावात नाटक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व्हायचे. गावामध्ये शामराव भाऊ व्हरकट यांचा लोकरंजन संगीत मेळा सांस्कृतिक 

कार्यक्रम याच आयोजन व सादरीकरण करायचा.  सध्याची सटवाईकडे जाण्याची डावीकडील बाजू त्या ठिकाणी पूर्वी लिंबाची मोठीमोठी झाडे होती त्या भागाला गावामध्ये गाढवलोळी म्हणत असत , त्याकाळी गावाला देशमुख साहेब  ग्रामसेवक होते त्यांच्या पुढाकारातून गावात ' माळावरची माणस ' हे नाटक सादर केल गेल नाटकाच्या तिकीटाच्या आलेल्या पैशातून गावामध्ये शाळेच्या दोन वर्गखोल्या बांधल्या गेल्या यावरून आरळीकरांच शिक्षणाप्रती असलेल प्रेमदेखील दिसून येत. 

आरळी बु गावामध्ये घनवड नावाच दगडी यंत्र होत जे की वाळू व चुना एकत्र करायच. गावामध्ये गोसावी राजुमाईचा मठदेखील होता.  आरळी बु चा ग्रामदैवत ख्वाजा बंदेनवाज यात्रेची सुरुवात संदल ने सुरू होते आज देखील ही परंपरा कायम आहे. 

आता आरळी बु गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने यात्रा साजरी करतात , आरळी बु महोत्सव सारखा राज्यस्तरीय नृत्य महोत्सव देखील गावात आयोजित केला जातो. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गावातील सेवानिवृत्त , नव्याने नोकरीत रुजू झालेल्या गावतील व्यक्तींचा सत्कार केला जातो . 

          आरळी बु गावात असणारी सर्वधर्म समभाव ची परंपरा गावातील जुन्या पिढीकडून मिळालेला वारसा नवी पिढी नक्की जपेल येणाऱ्या काळात ग्रामदैवत ख्वाजा बंदेनवाज यात्रा आणखी उत्साहात साजरी केली जाईल . 

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]

| Designed by simplegoshti